Home शिकू आनंदे या शिका रशियात!

या शिका रशियात!

0

जगाच्या कक्षा रुंदावल्यात त्याचप्रमाणे शिक्षणक्षेत्रातही प्रगती दिसतेय. आज जगाच्या एका टोकावरील देशाचा विद्यार्थी दुस-या टोकावरील देशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो इतक्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. रशियाने देखील त्यांच्या विद्यापीठांमध्ये अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी यावं असं आवाहन केलं आहे.

आज भारतासारख्या चांगल्या शिक्षण सुविधा देणा-या देशामध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत, त्याचप्रमाणे हजारो भारतीय विद्यार्थी देखील उच्चशिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. बाहेरच्या देशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठमोठया देशांना जास्त पसंती देतात. या देशांमध्ये आता रशियाचीही भर पडली आहे.

रशियन फेडरेशनच्या वतीने रशियन विद्यापीठांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती आरक्षण अधिकृतपणे जाहीर केले आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात प्रवेश मिळाला नाही तर रशिया सरकार त्यांना एमबीबीएस आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची एक अनोखी संधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणूनच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

पीपल्स फ्रेन्डशिप युनिव्हर्सटिी ऑफ रशिया (मॉस्को), आय.एम. सेचनाव मॉस्को मेडिकल अ‍ॅकॅडमी, सेंट पीटर्सबर्ग आय. पी. पावलोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सटिी, याझान स्टेट आय. पी. पावलोव्ह मेडिकल युनिव्हर्सटिी, निझनी नोव्हगोरोडे स्टेट मेडिकल युनिव्हर्सटिी, मारी स्टेट टेक्निकल युनिव्हर्सटिी (मारएसटीयू), अस्त्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सटिी, टामबोव्ह स्टेट युनिव्हर्सटिी, साराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सटिी आणि सेंट पीटर्सबर्ग स्टेट पॉलिटेक्निकल युनिव्हर्सटिी या रशियातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या संधी उपलब्ध आहेत.

उपलब्ध आकडेवारीनुसार हजारो भारतीय विद्यार्थी दरवर्षी रशियातील प्रमुख विद्यापीठांमधून यशस्वीपणे पदवी घेऊन बाहेर पडतात. गेल्या १५ ते २० वर्षामध्ये परदेशांमधून रशियन फेडरेशनमध्ये येणा-या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठया प्रमाणात वाढली आहे. सुरक्षितता आणि पारदर्शकता राखण्यासाठी भारतातील कॉन्सुलेट जनरल ऑफ रशियन फेडरेशनने रशिया सरकार आणि सरकारी विद्यापीठांच्या ‘एडय़ूरशिया’ या भारतातील अधिकृत प्रवेश विभागाला मान्यता दिली आहे. ‘एडय़ूरशिया’ हे अधिकृत माहिती आणि प्रवेश केंद्र आहे आणि ते रशियन सरकारच्या विद्यापीठांचे भारतातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालय म्हणूनही कार्यरत आहे.

रशियन फेडरेशनमधील एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी जे शुल्क आहे, ते साधारण भारतात एमबीबीएससाठी येणा-या खर्चाएवढेच आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे रशियामध्ये डोनेशन/कॅपिटेशन फी असे कोणतेही अतिरीक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळेच अशा अभ्यासक्रमाचा (आंतरराष्ट्रीय स्तरावर या अभ्यासक्रमाला

एम. डी फिजिशियन असे म्हणतात) खर्च हा एकूण साधारण १२ ते १५ लाख रुपयांच्या घरात असतो. त्यात अभ्यासक्रम शुल्क, राहण्याची व्यवस्था, वाहतूक आणि वैद्यकीय विमा या सुविधांचा समावेश आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्याचबरोबर त्या त्या देशांमधील भारतीय दूतावासांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठांमध्येच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. जर त्या विद्यार्थ्यांला पुन्हा भारतात प्रॅक्टिस करण्याची इच्छा असेल तर त्याला चाचणी परीक्षा उत्तीर्ण होऊनच परत येता येते. हा सर्वच विद्यार्थ्यांना लागू असलेला वैश्विक नियम आहे.

‘एडय़ूरशिया’चे मनोज पत्की यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळा अनधिकृत एजंट्सकडून पसरलेली चुकीची माहिती कित्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात गोंधळ निर्माण करते. त्याचबरोबर रशियातील शिक्षणाबाबतही बदनामी होते.

रशियन विद्यापीठांमधून ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांची एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना भारतात येऊन चाचणी परीक्षा देताना कोणतीही समस्या उद्भवत नाही. १९९०च्या दशकानंतर कित्येक भारतीय विद्यार्थी आपली पदवी रशियांतील विद्यापीठांमध्ये पूर्ण करून यशस्वीपणे भारतात परतू लागले आहेत. खरे पाहता ‘एडय़ूरशिया’ने ज्या ३,००० हूनही अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, ते सर्व आता केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपली प्रॅक्टिस करत आहेत.

त्याचे कारण म्हणजे आम्ही आमच्या विद्यापीठांना चाचणी परीक्षांच्या बाबतीत अगदी अद्ययावत ठेवत असतो आणि ही विद्यापीठे अगदी पहिल्याच वर्षी या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तयार करत असतात असेही ते म्हणाले. त्याचा अतिरिक्त फायदा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे, ते विद्यार्थी युरोपमध्येही त्यांची पॅ्रक्टिस करू शकतात आणि तेथेच कायमचे राहू शकतात. त्यासाठी त्यांना कोणतीही प्रवेश परीक्षा किंवा चाचणी परीक्षाही द्यावी लागत नाही.

रशियन फेडरेशन ही ‘बोलोग्ना कॉन्व्हेशन’मधील एक सिग्नेटरी असून त्यामुळे तिला शिक्षणामधील मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारे रशियामध्ये घेण्यात आलेली पदवी ही विद्यार्थ्यांला युरोपातच नाही तर मध्यपूर्वेकडील देशांमध्ये कुठेही पॅ्रक्टिस करण्याची मुभा मिळवून देते. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंडमधील पीलब नोंदणी यासाठी पात्र आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन मेडिकल कौन्सिल (एएमसी)मधील नोंदणीसाठीही ही पदवी पात्र आहे.

गेल्या १५ वर्षामध्ये मुलांपेक्षा मुलींनीच जास्त प्रमाणात रशियन फेडरेशनमधील एमबीबीएस आणि बीडीएस यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांसाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी येथील वातावरण अगदी सुरक्षित असे आहे. तेथील राहणीमान हे युरोपातील सर्वोत्तम असे राहणीमान आहे. रशियामध्ये एमबीबीएस पदवी घेण्यातील फायदे अधिक आहेत. त्यात जागतिक स्तरावरील प्रयोगशाळा, ग्रंथालये, अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि मनोरंजन सुविधा यासह येणा-या भव्य व आधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

त्याशिवाय प्रत्येक वर्गात केवळ ८ ते १२ मुले असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरविणे सोपे जाते. दरवर्षी परीक्षा होतात आणि त्याद्वारे जागतिक स्तरावरील अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो. खरं पाहता भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशिया हा देश उच्च वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पारखून घेतलेला आणि सर्व कसोटय़ांवर उतरलेला आहे.

अधिक माहितीसाठी ‘एडय़ूरशिया’ या विद्यापीठांच्या भारतातील व रशियातील प्रवेश आणि प्रक्रिया विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. एमबीबीएस आणि एमबीए पदव्यांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आघाडीच्या रशियन विद्यापीठांशी www.edurussia.in  या वेबसाईटवर तसेच apply@edurussia.in  या ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. त्याशिवाय पुढील दूरध्वनीवरही संपर्क साधता येईल- ९९२०८६८७२७ / ९७६९५५९८५५ / ०२२- ६५१७४४४४ / ०२२- ६५२९५३५४

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version