Home टॉप स्टोरी याकूब मेमनच्या याचिकेवर आज निर्णय

याकूब मेमनच्या याचिकेवर आज निर्णय

0

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब अब्दुल रझाक मेमनच्या पुर्नविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब अब्दुल रझाक मेमनच्या पुर्नविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकूबने फाशीच्या शिक्षेवर पुर्नविचार करण्यात यावा याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली होती. यावर आज निर्णय होणार आहे.

दुपारी एक वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुख्य न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५० जण ठार झाले होते, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. याकूब स्फोटाचा मास्टरमाईंड होता.

२००७ मध्ये याकूबला टा़डा न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही फाशीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. यानंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.

न्यायालयाच्या या निर्णयावर मेमन याने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती. अखेर राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावत मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version