Home देश याकूब मेमनच्या फाशीवरील स्थगिती कायम

याकूब मेमनच्या फाशीवरील स्थगिती कायम

0

सर्वोच्च न्यायालयाने याकूब अब्दुल रझाक मेमनच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवली आहे. 

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने याकूब अब्दुल रझाक मेमनच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवली आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात याकूब मेमनला फाशीची शिक्षा झाली आहे.

याकूब मेमनने फाशीच्या शिक्षेचा पूर्नविचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मेमनच्या याचिकेवर महाराष्ट्र एसटीएफ आणि सीबीआयला नोटीस पाठवली असून, त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.

न्यायमूर्ती ए.आर.दवे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने मेमनच्या याचिकेवर सुनावणी केली. मेमनने दाखल केलेल्या पूर्नविचार याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय़ झालेला नसल्याने त्याच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

यावर पुढील सुनावणी २८ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. याकूब मेमनला का फाशी दिली जात आहे याबद्दल सत्र न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही विशेष कारण दिलेले नाही असे मेमनच्या वतीने युक्तीवाद करणा-या वकीलाचे म्हणणे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version