Home देश मोदींच्या विखारी प्रचाराला चाप लावा

मोदींच्या विखारी प्रचाराला चाप लावा

0

कॉँग्रेस ‘विषारी’ पक्ष असल्याचा उल्लेख केल्याप्रकरणी शुक्रवारी कॉँग्रेसने मोदी व भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील सभेसाठी भाजपने उभारलेली लाल किल्ल्याची प्रतिकृती व मोदींनी आपल्या भाषणात कॉँग्रेस ‘विषारी’ पक्ष असल्याचा उल्लेख केल्याप्रकरणी शुक्रवारी कॉँग्रेसने मोदी व भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच भाजप नेत्या वसुंदरा राजे व राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव यांच्याविरोधातही कॉँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी भाजपने सभामंचामागे लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती. लाल किल्ला हे राष्ट्रीय स्मारक व सरकारची मालमत्ता आहे. त्यामुळे भाजप त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रचारसभेत वापर करू शकत नाही.

तसेच २५ नोव्हेंबर रोजी मोदी यांनी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देत कॉँग्रेसवर टीका करताना गेली ६० वर्षे कॉँग्रेसची सत्ता असून, या काळात कॉँग्रेसने देशात विष पसरवण्याचे काम केले असून, कॉँग्रेस हा ‘विषारी’ पक्ष असल्याचे म्हटले होते. या दोन्ही प्रकरणी आखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सचिव के. सी. मित्तल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडे तक्रार केली आहे.

मोदी व ‘त्या’ तरुणीचे छायाचित्र वेबसाईटवर
एका तरुण मुलीवर पाळत ठेवल्याप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर होत असलेल्या आरोपाप्रकरणी गुरुवारी ‘गुलेल’ या वेबसाईटने नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी अमित शहा आणि गुजरातचे निलंबित पोलिस अधिकारी जी. एल. सिंघल व ‘ती’ मुलगी चर्चा करत असल्याचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. या छायाचित्रावरून ती मुलगी व मोदी हे एकमेकांना २००५ पासून ओळखत असल्याचे समोर आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version