Home महामुंबई मोदींच्या भाषणबाजीच्या जाहिरातींची तक्रार

मोदींच्या भाषणबाजीच्या जाहिरातींची तक्रार

0

‘मोदींच्या भाषणाची किमया’ या नावाने अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील पंतप्रधानांच्या भाषणाच्या वृत्तवाहिन्यांवर होत असलेल्या जाहिरातींनी भाजप पुन्हा अडचणीत सापडला आहे.

मुंबई- ‘मोदींच्या भाषणाची किमया’ या नावाने अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील पंतप्रधानांच्या भाषणाच्या वृत्तवाहिन्यांवर होत असलेल्या जाहिरातींनी भाजप पुन्हा अडचणीत सापडला आहे. या जाहिरातींमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीने केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सध्या भाजपकडून विविध जाहिरातींमार्फत प्रचार केला जात आहे. ‘कुठे ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ पासून ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद’ पर्यंतच्या जाहिरातींचा त्यात समावेश आहे. भाजपच्या जाहिरातींबाबत नाराजी असतानाच ‘मोदींच्या भाषणाची किमया’ या नावाने मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील पंतप्रधानांच्या भाषणाचे वृत्तवाहिन्यांवर होणा-या पुन्हा प्रक्षेपण दाखवण्यात आले.

या जाहिरातीत न्यूयॉर्कच्या भाषणाचे विविध वृत्तवाहिन्यांवर होणा-या पुन:प्रक्षेपणाचा तपशील दिला आहे. मोदी हे अमेरिकेत देशाचे पंतप्रधान म्हणून गेले होते, ते भाजपचे पंतप्रधान नाहीत. राजशिष्टाचाराप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधानांच्या भाषणांचा वापर करता येत नाही. भाजपने त्याची जाहिरात करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version