Home देश मोदींच्या निवेदनावेळी माझा माईक बंद ठेवला होता

मोदींच्या निवेदनावेळी माझा माईक बंद ठेवला होता

0

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत निवेदन सादर करताना माझा माईक बंद करण्यात आला होता, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खग्रे यांनी केला आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत निवेदन सादर करताना माझा माईक बंद करण्यात आला होता, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खग्रे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सोमवारी तक्रार केली. लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या कार्यकाळात खग्रे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, ‘साध्वी निरंजन ज्योती यांच्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी शुक्रवारी निवेदन सादर केल्यानंतर मी सभागृहात सादर केलेल्या कागदपत्रांचीही दखल घेण्यात आली नाही. तसेच माझ्याकडून व्यक्त करण्यात आलेली प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांवरही दाखवण्यात आली नाही. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, याबाबत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काळजी घ्यावी’. यावर लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतरच माईकवर बोलायचे असते, असे सुमित्रा महाजन यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version