Home टॉप स्टोरी मोगा विनयभंग प्रकरणाचे संसदेत पडसाद

मोगा विनयभंग प्रकरणाचे संसदेत पडसाद

0

मोगा विनयभंग प्रकरणाचे मंगळवारी लोकसभेमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसने स्थगन प्रस्तावाची नोटीस देऊन पंजाबमधल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चेची मागणी लावून धरली.

नवी दिल्ली – मोगा विनयभंग प्रकरणाचे मंगळवारी लोकसभेमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसने स्थगन प्रस्तावाची नोटीस देऊन पंजाबमधल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चेची मागणी लावून धरली.

प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन तात्काळ हा विषय चर्चेला घ्यावा अशी काँग्रेसची मागणी होती. या गदारोळामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली होती. काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते अमरींदर सिंग यांनी हा विषय उचलला.

पंजाबमधल्या मोगामध्ये बसमध्ये मुलीची छेडछाड करुन तिला धावत्या बसमधून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात मुलीचा मृत्यू झाला होता.

ज्या बसमधून या मुलीला फेकून देण्यात आले ती, ऑरबीट बस सत्ताधारी बादल कुटुंबाच्या मालकीची आहे. अमरींदर सिंह यांनी सोमवारी मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली. पंजाबमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली असून बादल ब्रिटीशांसारखे वागत आहेत अशी बोचरी टिका अमरींदर सिंह यांनी केली होती. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version