Home देश मेरठमध्ये घरात सापडले सहा मृतदेह

मेरठमध्ये घरात सापडले सहा मृतदेह

0

मेरठ शहरातील एका घरात महिलेसह तिच्या चार मुलांची आणि एका पुरुषाची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

मेरठ – मेरठ शहरातील एका घरात महिलेसह तिच्या चार मुलांची आणि एका पुरुषाची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी मेरठ पोलिसांना एक घरात सहा ते सोळा वयोगटातील चार मुले मृतावस्थेत आढळली. या चारही मुलांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.

या घरापासून चार कि.मी. अंतरावर बांधकाम अवस्थेत असलेल्या घरामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुखसाना असे मृत महिलेचे नाव असून, ही चारही मुले या महिलेची आहेत.

रुखसाना मुझफ्फरनगरमधील खतौली गावची रहिवाशी होती. रिनशा (१६), ज्युली (८), गुणजी (६) आणि सुहैल (१२) अशी या चार मृत मुलांची नावे आहेत. रुखसानाचा पती नावेद गेल्या दीडवर्षांपासून मुझफ्फरनगर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

या हत्येमागे जातीयवाद नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नावेद आणि त्याच्या भावांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. भावानेच नावेद विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केल्याने नावेद तुरुंगात आहे. रुखसाना बरोबर ज्या पुरुषाचा मृतदेह सापडला त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version