Home किलबिल मॅग्नस कार्लसन

मॅग्नस कार्लसन

0

मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा बुद्धिबळपटू यंदा पाच वर्ष या खेळात विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला हरवून या खेळाचा नवा जगज्जेता बनला आहे. मॅग्नसचा जन्म ३० नोव्हेंबर, १९९० रोजी टॉन्सबर्ग, नॉर्वे येथे झाला. 

मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा बुद्धिबळपटू यंदा पाच वर्ष या खेळात विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला हरवून या खेळाचा नवा जगज्जेता बनला आहे. मॅग्नसचा जन्म ३० नोव्हेंबर, १९९० रोजी टॉन्सबर्ग, नॉर्वे येथे झाला. त्याचं पूर्ण नाव ‘स्वेन मॅग्नस ओएन कार्लसन’ असं आहे. २६ एप्रिल २००४ रोजी वयाच्या केवळ तेराव्या वर्षी तो बुद्धिबळ या खेळात ‘ग्रँडमास्टर’ झाला. तो जगातला दुसरा लहान वयाचा ग्रँडमास्टर ठरला. मॅग्नस दोन वर्षाचा असल्यापासूनच त्याला बौद्धिक खेळ आवडू लागले होते. ५० तुकडय़ांचं जीगसॉ पझलही तो सहज सोडवत असे. ते पाहून पाच वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांनी त्याची बुद्धिबळ या खेळाशी ओळख करून दिली.
बुद्धिबळातली कोणती चाल चतुराईने कशी खेळता येईल हे शिकण्यासाठी कित्येकदा स्वत: एकटाच बसून तो दोन्ही बाजूंनी स्वत:च खेळत असे. त्याने १९९९मध्ये नॉर्वेजियन चेस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. ही त्याच्या आयुष्यातली पहिली स्पर्धा होती. त्याने एकूण ३००पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version