Home महामुंबई मॅक्सेल अ‍ॅवॉर्डस पुरस्कार सोहळा

मॅक्सेल अ‍ॅवॉर्डस पुरस्कार सोहळा

0

उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या महाराष्ट्रातील उद्योजकांचा सन्मान मॅक्सेल फाऊंडेशनतर्फे केला जातो. 

मुंबई- उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या महाराष्ट्रातील उद्योजकांचा सन्मान मॅक्सेल फाऊंडेशनतर्फे केला जातो. यंदाचा पाचवा मॅक्सेल सन्मान सोहळा नुकताच वरळीतील नेहरू सेंटरच्या सभागृहात झाला.

बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या हस्ते निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मॅक्सेल लाईफटाईम अचिव्हमेन्ट अ‍ॅवॉर्ड या पुरस्काराने महाराष्ट्र हायब्रीड सीड्सचे अध्यक्ष डॉ बी. आर. बारवाले यांना सन्मानित करण्यात आले. बी. वी. जी. ग्रुपच्या एच. आर. गायकवाड यांना मॅक्सेल अ‍ॅवॉर्र्डस फॉर एक्सलन्स इन आन्त्रप्रेन्युअरशिप या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मॅक्सेल अ‍ॅवॉर्र्डस फॉर एक्सलन्स इन बिझनेस लीडरशिप या पुरस्कारासाठी एअरबस इंडियाचे उपाध्यक्ष आशीष सराफ यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे तर प्रास्ताविक मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक नितीन पोतदार यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version