Home देश मुलीचा विवाह ही देणी, उमेदवाराचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख

मुलीचा विवाह ही देणी, उमेदवाराचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख

0
Jammu & Kashmir map

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराने प्रतित्रापत्रात मुलीचा विवाह देणी या सदरात टाकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराने प्रतित्रापत्रात मुलीचा विवाह देणी या सदरात टाकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेस उमेदवार मोहम्मद युसुफ भट यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देणी या सदरात ‘अविवाहीत मुलीचे लग्न’ असा उल्लेख केला आहे.

भट यांच्या या प्रतिज्ञापत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्टीकरण दिले. माझी मुलगी माझ्यावर ओझ नाही. माझा मुलगा पैसे कमावतो, मात्र मुलगी पैसे कमावत नाही. त्यामुळे ती माझ्यावर अवलंबून आहे आणि मलाच तिच्या लग्नाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, असे भट यांनी सांगितले.

मुलीचे लग्न ही एक जबाबदारी असते. जेव्हा मुलगी पैसे कमवत नाही, तेव्हा तर ती एक मोठी जबाबदारी असते. माझ्या शब्दाचा चुकाचा अर्थ लावल्याचा दावा भट यांनी केला.

मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याची जबाबदारी माझीच असेल या अर्थाने मी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. मात्र माझी मुलगी माझ्यासाठी देणी नसल्याचे भट यांनी स्पष्ट केले.

भट यांनी नुकताच नॅशनल कॅन्फरन्सचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version