Home देश मुख्य निवडणूक आयुक्तपदी हरिशंकर ब्रम्हा?

मुख्य निवडणूक आयुक्तपदी हरिशंकर ब्रम्हा?

0

माजी आयएएस अधिकारी हरिशंकर ब्रम्हा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – माजी आयएएस अधिकारी हरिशंकर ब्रम्हा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त वीरावल्ली सुंदरम संपथ हे उद्या म्हणजेच १५ जानेवारी २०१५ रोजी निवृत्ती घेत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर हरिशंकर ब्रम्हा हा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

ब्रम्हा हे १९७५च्या बॅचचे आंध्रप्रदेश केडररचे माजी आयएएस अधिकारी आहेत. २५ ऑगस्ट २०१० मध्ये ब्रम्हा यांनी निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता.  जे. एम.लिंदोह यांच्यानंतर या पदावर वर्णी लागलेले ब्रम्हा हे ईशान्य भागातील हे दुसरे अधिकारी आहेत

निवडणूक आयुक्तपदी काम करण्याआधी त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. तसेच ते माजी केंद्रीय उर्जा सचिव आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version