Home टॉप स्टोरी मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम झैदी यांची नियुक्ती

मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम झैदी यांची नियुक्ती

0

निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॉ. नसीम झैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी झैदी यांच्या नावाची घोषणा केली.

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॉ. नसीम झैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी झैदी यांच्या नावाची घोषणा केली.

येत्या १८ एप्रिलला सध्याचे निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रम्हा निवृत्त होत आहेत. त्यानंतर १९ एप्रिलपासून झैदी आयुक्तपदाचा कार्यभार होती घेतील. झैदी यांची आयुक्तपदी निवड झाल्याने सरकारला आता निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय समितीवर दोन सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.

माजी निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ जानेवारीमध्ये निवृत्त झाले होते त्यानंतर ब्रम्हा यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती.

झैदी २०१७ पर्यंत आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील. १९७६च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेले झैदी यांनी नागरी वाहतूक मंत्रालयातही काम केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version