Home टॉप स्टोरी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतक-यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतक-यांची घोषणाबाजी

0

लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतक-यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

नाशिक  –  लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतक-यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. समृद्धी महामार्गाला विरोध असणा-या शेतक-यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना दिले.नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लासलगावमध्ये शेतक-यांना संबोधित केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच संबोधित करत असताना काही शेतकरी उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करायला सुरूवात केली.घोषणाबाजी करणा-या शेतक-यांना मुख्यमंत्र्यांनी खाली बसण्याची विनंती केली. मात्र शेतक-यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली.

घोषणाबाजी करणा-या शेतक-यांचा आवाज दडपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. जेव्हा हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेक्ष प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, तसेच पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावलही उपस्थित होते.समृद्धी महामार्गाला विरोध असणा-या शेतक-यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. त्यामुळे एकंदर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौ-या दरम्यान शेतक-यांकडून सरकार विरोधी जोरदार आवाज उठविण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version