Home टॉप स्टोरी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेची बोळवण

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेची बोळवण

0

आमदार शिवाजी कर्डिले यांना क्लिन चीट देत शिवसेनेची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी फेटाळून लावली.

मुंबई- अहमदनगरमधील शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात हात असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे कर्डिलेंच्या हकालपट्टीवरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा तलवार म्यान करावी लागली आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केले. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. पण त्यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले. मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आमदार शिवाजी कडीर्ले यांची भाजपातून हकालपट्टी होणार नाही, मात्र शिवसैनिकांवर दाखल झाले गुन्हे मागे घेऊ. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांची बोळवण केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेआहे.

बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी ७ एप्रिलला हे हत्याकांड झाले होते.

केडगावमधील दुहेरी खुनाच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या पोलीस कोठडीत १२ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रविवारी अटक करण्यात आलेल्या २२ जणांची मात्र न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

आता बस्स झाले, मुख्यमंत्र्यांनी खडसावले

नगरमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणात अटक असलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी सेनेच्या मंत्र्यांनी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावली. तसेच या पुढे हा विषय आता बस झाला, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. या मागणीसाठी रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्डिले यांना पक्षातून काढण्याची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. हा विषय जास्त ताणून धरू नका. झाले ते खूप झाले, अशा शब्दांत सेनेची कानउघाडणी केली.

शिवसेनेच्या ६०० कार्यकर्त्यांवर गुन्हे

या हत्याकांडात आजपर्यंत ६०० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलली तोडफोड आणि नासधुसीमुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे नोंद करु नयेत अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version