Home ताज्या घडामोडी मुंबई विद्यापीठाकडून रुसाच्या नियमांचे उल्लंघन

मुंबई विद्यापीठाकडून रुसाच्या नियमांचे उल्लंघन

0

केंद्राचा निधी एफडीमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस

मुंबई – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)अंतर्गत मिळालेल्या निधीला मुंबई विद्यापीठाने आपल्या मुदत ठेव (एफडी) खात्यात जमा केले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे रुसाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. हा प्रकार कॅगच्या अहवालातून समोर आला. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रुसा ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवीन अभ्यासक्रम आणि क्लस्टर विद्यापीठ सुरू करून उच्च शिक्षणाला एक नवी दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे. या रुसाच्या उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाला २०१५-१६ या वर्षासाठी ५ कोटी रुपये मिळाले होते. या निधीचा उच्च शिक्षणाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी उपयोग करायचा होता. मात्र विद्यापीठाने हा निधी आपल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील एफडीमध्ये जमा केला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे रुसा योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यानंतर रुसाअंतर्गत मिळालेला निधी एफडीमध्ये ठेवण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहे.

उच्च शिक्षणाच्या सुधारणेसाठी आणि विद्यार्थ्यांना कल्याणासाठी रुसाअंतर्गत निधी देण्यात येतो त्यामुळे हा संपूर्ण निधी केवळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठीच वापरण्यात यावा. मात्र विद्यापीठानी विद्यार्थ्यांऐवजी स्वत:चा विचार यावेळी केला असल्याची खंत विद्यार्थी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. कॅगच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये मुंबई विद्यापीठाच्या दहा वर्षातील कारभाराचा उल्लेख करण्यात आला आहे. २३-६-२०१६ रोजी एफडीमध्ये ठेवण्यात आले. यातून विद्यापीठाला ३७ लाखांचे व्याजदेखील मिळाले. यापासून मिळालेले व्याज रुसाच्या खात्यात जमा करण्यात आले की नाही यासंदर्भात कॅगच्या अहवालात नोंद नाही.

व्याजासह रक्कम रुसाच्या खात्यात जमा
रुसा या उपक्रमाअंतर्गत मिळालेला निधी काही काळासाठी विद्यापीठाने एफडीच्या खात्यात ठेवला होता. मात्र, तो नंतर व्याजासह रुसाच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version