Home महामुंबई मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपीची नाशिक कारागृहात रवानगी

मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपीची नाशिक कारागृहात रवानगी

0
संग्रहीत छायाचित्र

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी दादाभाई परकारला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

मुंबई- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी दादाभाई परकारला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

१६ मे रोजी संजय दत्तसह काही आरोपी टाडा न्यायालयात शरण आले होते. मात्र परकार आणि झैबुन्नीसा काझी वैद्यकीय कारणास्तव न्यायालयास शरण आले नव्हते. न्यायालयाने या दोघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते शरण आले होते. दोघांनाही न्यायालयात स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवर आणण्यात आले होते. 

हे दोघेही दुर्धर आजाराने त्रस्त असल्याची माहिती त्यांच्या वकील फरहाना शहा यांनी न्यायालयाला दिली. झैबुन्नीसाला कर्करोग झाला असून, परकारला शरण येण्याच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याच्यावर महाडच्या स्थानिक रुग्णालयात उपचार झाले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. शरण आल्यानंतर झैबुन्नीसाला भायखळ्याच्या महिला कारागृहात ठेवण्यात आले असून, ७५ वर्षाच्या परकारला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

तत्पूर्वी त्याला आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले होते. पण या कारागृह प्रशासनाने त्याला नाशिकच्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अ‍ॅड. शहा यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version