Home टॉप स्टोरी मुंबई पोलिसांतील १८ अधिका-यांशी दाऊदचे संबंध

मुंबई पोलिसांतील १८ अधिका-यांशी दाऊदचे संबंध

0

मुंबई पोलिसांतील १८ अधिका-यांशी दाऊदचे संबंध असल्याचा दावा गँगस्टर छोटा राजन याने केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

नवी दिल्ली- मुंबई पोलिसांतील १८ अधिका-यांशी दाऊदचे संबंध असल्याचा दावा गँगस्टर छोटा राजन याने केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. नवी दिल्ली येथे सीबीआय कोठडीत असलेल्या छोटा राजनने प्राथमिक चौकशीत दाऊदशी संबंध असलेल्या मुंबई पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिका-यांची नावे उघड केली असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात एप्रिल २०१० मध्ये विधान परिषदेत विजय साळसकर यांच्या मृत्यूला अनामी रॉय व मीरा बोरवणकर जबाबदार असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. शहीद विजय साळसकर यांच्या जिवाला धोका असल्याने पोलीस दलाने त्यांना स्वसंरक्षणासाठी एके-४७ रायफल दिली होती; पण दाऊदशी संबंध असणारे गोवा गुटख्याचे मालक जोशी यांच्यावर कारवाईची तयारी साळसकरांनी केल्याने अनामी रॉय आणि मीरा बोरवणकर यांनी साळसकर यांच्यावर तसे न करण्यासाठी दबाव टाकला; पण साळसकरांनी ऐकले नाही म्हणून त्यांच्याकडील एके-४७ रायफल रॉय आणि बोरवणकर यांनी काढून घेतली. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यावेळी साळसकर यांच्याकडे ती रायफल असती, तर चित्र वेगळे दिसले असते. साळसकर यांच्या मृत्यूला अनामी रॉय आणि मीरा बोरवणकर हेच जबाबदार असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अटक करा, मोक्का लावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. तसेच एसीपी पाडवी यांचे दाऊदशी संबंध असल्याची नोंद तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी गोपनीय अहवालात केल्याचेही कदम विधान परिषदेत म्हणाले होते.

त्याचवेळी दहशतवाद्यांना आपल्या कुलाब्यातील कार्यालयात भेटणारा आणि त्यांना आर्थिक मदत देणारा नेता कोण, असा सवाल पांडुरंग फुंडकर यांनी केला होता. पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे सिद्ध करणा-या घटना समोर येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

आता मुंबई पोलिसांचे दाऊदशी संबंध असल्याचा दावा गँगस्टर छोटा राजन याने केला आहे. थोड्याच वेळात सीबीआय नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version