Home ताज्या घडामोडी मुंबईत विविध दुर्घटनांत ९८७ लोकांचा बळी

मुंबईत विविध दुर्घटनांत ९८७ लोकांचा बळी

0

पाच वर्षात ४९,१७९ घटना, माहिती अधिकारात माहिती उघड

मुंबई – भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडेपाच वर्षात मुंबईत तब्बल ४९१७९ दुर्घटनेत ९८७ लोकांची बळी ३०६६ जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.

झाडे, झाडांच्या फांद्या पडणे, दरड कोसळणे, घर, घरांचे छत कोसळणे, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळणे, तडे जाणे, आगीच्या घटना, गॅस गळती, रस्त्यावर आईल पडणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, मैनहोलमध्ये पडून मृत्यू होणे आदी घटनांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला २०१३ ते २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या, तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले आहे, याबाबत माहिती विचारली होती.

सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिली. जुलै २०१३ ते २०१८ पर्यंत एकूण ४९१७९ आपत्कालीन दुर्घटनेत झाल्या आहे. या दुर्घटनेत ९८७ जणांचा मृत्यू, तर ३०६६ जण जखमी झाले आहेत.

मुंबईत उद्भवणा-या आपत्कालीन दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी पालिका आयुक्त अजोय मोहता व प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version