Home देश मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करुन लोकसभा तहकूब

मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करुन लोकसभा तहकूब

0

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना लोकसभेत श्रद्धांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली- केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना लोकसभेत श्रद्धांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

सोळाव्या लोकसभेचे कामकाज बुधवारी सकाळी सुरू होताच हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमलनाथ यांनी लोकसभा सदस्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर आज होणारा लोकसभा सदस्यांचा शपथविधीचा कार्यक्रम उद्या होणार असल्याचे जाहीर करुन त्यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

आजचे कामकाज तहकूब झाल्याने शपथविधीचा कार्यक्रम पाच आणि सहा जूनला होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version