Home विदेश मिस तुर्कीकडून किताब काढून घेण्यात आला!

मिस तुर्कीकडून किताब काढून घेण्यात आला!

0

अंकारा – भूतकाळात सोशल मीडियावर व्यक्त केलेली मते, तुमचे भविष्य पालटण्यासाठी कशी कारणीभूत ठरू शकतात, याचे उदाहरण तुर्कीमध्ये पाहायला मिळाले आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये पिरीएड्समधील रक्ताची तुलना शहीद जवानांनी वाहिलेल्या रक्ताशी केल्यामुळे ‘मिस तुर्की’चा किताब काढून घेण्यात आला.

इतिर एसेन या १८ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर मिस तुर्कीचा मुकुट ठेवण्यात आला. मात्र तिचा आनंद फार काळ टिकला नाही. तिने केलेला जुना ट्विट स्पर्धेच्या आयोजकांच्या समोर आला. हा ट्विट अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त करत काही तासातच तिचा किताब मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. तुर्कस्तानात झालेल्या सत्ताबदलाच्या प्रयत्नाचा १५ जुलै रोजी पहिला वर्धापन दिन होता. गेल्या वर्षी सत्ताबदलाचा प्रयत्न झाला, तेव्हा सैनिकांशी लढताना सुमारे २५० जणांना प्राण गमवावे लागले होते. वर्धापन दिली इतिरने केलेल्या ट्विटमध्ये मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांनी वाहिलेल्या रक्ताशी केली.

काय होते ट्विट?
१५ जुलै. शहीद दिनाच्या सकाळी मला पिरिएड्स आले आहेत. मी प्रतिकात्मकरित्या आपल्या शहिदांचे रक्त वाहून हा दिवस साजरा करत आहे, असे इतिरने लिहिले होते. आपण राजकारणातील तज्ज्ञ नाही, आपण राजकारणही करत नव्हतो, असं तिने इन्स्टाग्रामवर लिहिले. मिस तुर्की संघटनेकडून अशा प्रकारच्या ट्विट्सना प्रोत्साहन देण्याची शक्यताच नाही. जगात देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम मिस तुर्की करते, असे सांगत आयोजकांनी इतिरचा किताब परत घेतला. इतिर ऐवजी रनर अप ठरलेली अस्ली सुमेन चीनमध्ये होणा-या मिस वल्र्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version