Home Uncategorized मिशेलिन टायर्स आता स्नॅपडीलवर उपलब्ध

मिशेलिन टायर्स आता स्नॅपडीलवर उपलब्ध

0

जगातील आघाडीच्या टायर तंत्रज्ञान कंपनीने भारतातील आघाडीच्या बाजारपेठेचे व्यासपीठ असलेल्या स्नॅपडीलवर प्रवासी कार टायर्सच्या उपलब्धतेची घोषणा देशभरातील अधिकृत डीलरशिपच्या माध्यमातून केली आहे. 

मुंबई – जगातील आघाडीच्या टायर तंत्रज्ञान कंपनीने भारतातील आघाडीच्या बाजारपेठेचे व्यासपीठ असलेल्या स्नॅपडीलवर प्रवासी कार टायर्सच्या उपलब्धतेची घोषणा देशभरातील अधिकृत डीलरशिपच्या माध्यमातून केली आहे.

दर्जेदार फिटमेंट्ससोबत मिशेलिन टायर्स आता सहजसाध्य डीलर्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांच्या आणखी जवळ आले आहेत. तीन किंवा चार सोप्या टप्प्यांमध्ये ग्राहक आता सहजपणे ऑनलाईन ऑर्डर देऊन एकावेळी फिटमेंट आणि त्यांच्या आवडीच्या ठिकाणाची विनंती करू शकतात. स्नॅॅपडीलवर मिशेलिन टायर सिलेक्टरमुळे ग्राहकाला आपल्या वाहनासाठी सर्वोत्तम फिट बसणारे टायर निवडणे शक्य होईल.

टायरची निवड निश्चित झाल्यावर ग्राहक सर्वात जवळचा मिशेलिनचा अधिकृत डीलर खरेदीसाठी आणि टायर फिटमेंट अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी निवडू शकतात. ग्राहक त्याच दिवशी मोफत फिटमेंटचा पर्याय तसेच अलाइनमेंट आणि संतुलन अशा सेवांवर खास ऑफर्सही मिळवू शकतात. भारतात टायरची खरेदी आणि विक्रीच्या पद्धतीचा नव्याने अर्थ लावण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्हाला ही खास संधी आमच्या भारतीय ग्राहकांसाठी स्नॅपडीलद्वारे आणताना खूप आनंद होत आहे, असे मत मिशेलिन इंडियाचे वाणिज्यिक संचालक मोहन कुमार यांनी व्यक्त केले.

आमचा विश्वास आहे की, या नवीन पद्धतीमुळे आमचे सध्याचे वितरण आणखी वाढेल आणि आमच्या डीलर्सना समांतर विक्री मार्गही मिळेल. स्नॅपडीलचे उपाध्यक्ष बादल मलिक म्हणाले की, आम्हाला मिशेलिनशी भागीदारी करून आमच्या ग्राहकांना टायर खरेदी आणि फिटमेंटसाठी सर्वाधिक उत्तम अनुभव देताना खूप आनंद होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version