Home महामुंबई माथेरानमध्ये नववर्ष स्वागताची धूम

माथेरानमध्ये नववर्ष स्वागताची धूम

0

पर्यटनस्थळांच्या यादीत वेगळी छाप उमटवणा-या माथेरानमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

माथेरान – पर्यटनस्थळांच्या यादीत वेगळी छाप उमटवणा-या माथेरानमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मंगळवापर्यंत पर्यटकांची गर्दी कायम राहणार असल्याने त्यांच्या मनोरंजनासाठी हॉटेल्स तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांचा ओघ वाढल्याने संपूर्ण घाटरस्त्यावरील वर्दळही वाढली आहे. परिणामी रविवारी दुपारपासूनच खासगी वाहने घेऊन येणा-या पर्यटकांना नेरळ नाका येथे वाहने पार्क करण्याचे आवाहन नेरळचे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते.

माथेरान दस्तुरी नाक्यावरील पार्किंगही फुल्ल झाली होती. तर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमन लॉज-माथेरान शटल सेवाही पर्यटकांच्या गर्दीमुळे हाउसफुल्ल धावत होती. दरम्यान, माथेरान नगरपालिका आणि पोलिस यंत्रणेनेही पर्यटकांचे स्वागत केले असून, माथेरानमधील सर्वच हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात मोठया संख्येने डीजेसोबत विविध प्रकारचे गेम्स असणार आहेत. बाइक, उषा एस्कॉर्ट, रिव्हेरा, रिगल, ब्राइट लँड, हायलँड, रंगोली, रिचीरिच, पॉइंट व्ह्यू, पॅनोरमा, प्रीती आदी हॉटेल्ससोबतच इतर लॉजेसमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक १ जानेवारीपर्यंत मुक्काम ठोकणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version