Home महामुंबई ठाणे माथेरानच्या मिनीट्रेनची घसरण सुरूच

माथेरानच्या मिनीट्रेनची घसरण सुरूच

0

माथेरान-नेरळ दरम्यान धावणा-या नॅरोगेज मिनीट्रेनचा एक प्रवासी डबा रुळावरून घसरला. पर्यटन हंगामामुळे गाडी प्रवाशांनी भरली होती. 

माथेरान- माथेरान-नेरळ दरम्यान धावणा-या नॅरोगेज मिनीट्रेनचा एक प्रवासी डबा रुळावरून घसरला. पर्यटन हंगामामुळे गाडी प्रवाशांनी भरली होती. मात्र, या घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मागील आठ दिवसांत गाडीचा डबा घसरण्याची ही दुसरी घटना आहे.

धावणा-या नॅरो गेज मिनी ट्रेन ची एक प्रवासी डब्बा रुळावरुन घसरला.पर्यटन हंगाम असल्यामुळे गाडी प्रवाशांनी भरलेली होती.सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.आठ दिवसामधील ही दुसरी घटना आहे.

माथेरानहून नेरळला जाणारी गाडी सकाळी दहा मिनिटे उशिरा म्हणजेच साडेसात वाजता सुटली. ही गाडी ७.३९ ला अमनलॉज स्टेशनच्या थोडी पुढे गेली असता एनडीएम ६०३ क्रमांकाच्या इंजिनापासून पहिल्या बोगीचे चाक रुळावरुन घसरले. त्यामुळे प्रवाशांना परतीचा प्रवास टॅक्सीने करावा लागला.

मात्र, स्थानिकांच्या मदतीने १५ मिनिटात पुन्हा घसरलेली बोगी रुळावर घेण्यात आली. मागील आठ दिवसामधील डबा घसरण्याची ही दुसरी घटना असल्याने रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वे प्रशासनाच्या संबंधित सर्व अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन जागेची पहाणी केली.

यामध्ये विभागीय व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा अधिकारी, डिझेल लोकोचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी हजर होते. मात्र, या घटनेमुळे नेरळ-माथेरान आणि माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या रविवारच्या प्रवासी वाहतुकीवरही परिणाम झाला. नेरळवरून माथेरानला जाणारी मिनीट्रेनच्या दोन फे-या दोन तास उशिराने रवाना झाल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version