Home व्यक्तिविशेष माणिक बंडोजी ठाकूर

माणिक बंडोजी ठाकूर

0

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ असा वर परमेश्वराकडे मागणा-या माणिक बंडोजी ठाकूर यांचा आज जन्मदिन.

अजरावती जिल्ह्यातील यावली या गावी दि. २९ एप्रिल १९०९ रोजी माणिक ठाकूर यांचा जन्म झाला. बालपणापासून शाळेत गोड आवाजात भजने म्हणणारा हा माणिक ‘अडकुजी’ महाराजांच्या सेवेत आला आणि ‘तुकोडोजी’ झाला. आपल्या खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारे हेच ते संत तुकोडीजी महाराज! अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, जातीभेदावर आपल्या कीर्तनामधून भाष्य करणारे तुकडोजी महाराज महात्मा गांधी व विनोबाजींचे शिष्य होते.

१९३० व १९४२ च्या लढय़ात सक्रिय सहभागी झालेल्या व १९४२ मध्ये चिमूर-अष्टी येथील सत्याग्रहात अग्रभागी असणा-या तुकडोजी महाराजांनी ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बने सेना अशा शब्दांतून वीरश्री निर्माण केली. त्यांची ‘ग्रामगीता’ व ‘ईश्वरभक्ती करतानाच दुबळय़ांची सेवाही करा’ हा संदेश प्रसिद्ध आहे.

‘भूमीवरी पडावे, ता-याकडे पहावे।
प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या।’

अशी रचना करणा-या या राष्ट्रसंताने दि. १० नोव्हेंबर १९६८ रोजी मोझरी येथील आश्रमात आपला देह ठेवला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version