Home शिकू आनंदे माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

0

आपल्या शाळेविषयीचे ऋण फेडण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना मिळाली, तर शाळेचे रूपडे कसे बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वागदरी येथील शेळके प्रशालेचे १९९७ बॅचच्या माजी विद्यार्थी या विद्यार्थिनींनी आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.

१९९७च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याच शाळेत वृक्षारोपण केले. आपण याच शाळेत २२ वर्षापूर्वी शिकत असताना शाळेच्या परिसरात गर्द झाडीमुळे शाळा परिसर विशेषत: पावसाळ्यात हिरवेगार प्रसन्न वातावरण असायचे. पण काही वर्षापासून वागदरी शेळके प्रशालेच्या परिसरित पूर्वीसारखी झाडी नाही या माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी आपल्या बॅचकडून ५० विविध प्रकारच्या झाडांचे रोपटे घेऊन  शाळेच्या आवारात स्वत: जाऊन वृक्षारोपण केले. अनाठायी खर्चाला फाटा देऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र पैसे जमा करून हा आगळा वेगळा उपक्रम राबवला.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शखाली छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेचे चेअरमन मल्लीनाथ शेळके, सचिव मलप्पा मामा निरोळी, शाळेचे संचालक बसवराज शेळके, अनिल  देशमुख, पंचप्पा सोनकवडे, पुजारी, वाघमोडे, होटकर आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच १९९७ च्या बॅचचे  माजी विद्यार्थी संजय घोळसगाव, धोंडपा नंदे, श्रीमत भरमदे, सोमनाथ माशाळे, गजानन जिरगे, शरणा पाटील, शिवानंद कलबुर्गी, प्रशांत आगरखेड, प्रसाद वळसंग, शाणप्पा भैरामडगी, पिंटू चोळे, बमण्णा दुर्गे, निंगप्पा नडगेरी, गुरुनाथ हत्तीकाळे, परमेश्वर कणमुसे, कविराज घुगरे, काश्मीम बागवान व सोमनाथ ठोंबरे आदी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शाळेबदल आदर व प्रेम व्यक्त केला.

विद्यमान मुख्याध्यापक व १९९७च्या बॅचला शिकवलेले शाळेतील एकमेव शिक्षक सुभाष आदोडगी सरानी १९९७च्या बॅचला आदर्श माजी विद्यार्थी म्हणून पदवी बहाल केली. गेल्याच वर्षी याच माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील पालक हयात नसलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आर्थिक मदत स्वरूपात पोस्टात पैसे ठेवून आधार दिला होता. आता वृक्षारोपण व शाळेला झाडी भेट देऊन आदर्श निर्माण केला. या झाडाचे योग्य संगोपन करण्याची जबाबदारी शाळेतील मुलांना देण्यात येणार आहे. त्यासाठी लावलेल्या झाडांची दत्तक योजना तयार करून निगा घेतली जाईल. महाविद्यालये, शाळा किंवा शिक्षण देणा-या संस्थेविषयी ममत्व असते म्हणून तर माजी विद्यार्थी सक्रिय असलेले विद्यार्थी बोटावर मोजण्याएवढेच असतात. माजी विद्यार्थ्यांचे केवळ आर्थिक योगदान नव्हे, तर भावनिक पातळीवरचा जिव्हाळाही फार महत्त्वाचा असतो. सामाजिक बांधिलकीतून दुस-यांनाही प्रेरणा मिळते, म्हणून माजी विद्यार्थ्यांचे मोल पुढेही कायम राहील.
– धोंडपा नंदे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version