Home टॉप स्टोरी गांधीजींचे फक्त नाव घेतात..

गांधीजींचे फक्त नाव घेतात..

0

काही लोक गांधीजींचे फक्त नाव घेतात, मात्र त्यांच्या विचारांशी विसंगत वागतात, असे शरसंधान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर केले.

रामटेक- काही लोक गांधीजींचे फक्त नाव घेतात, मात्र त्यांच्या विचारांशी विसंगत वागतात, असे शरसंधान रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर केले. महाराष्ट्र हा सर्वांगीण विकासाच्या बाबतीत गुजरातच्या पुढेच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरजवळच्या रामटेक येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

गेल्या ६० वर्षात आम्ही काहीच काम केले नाही. मग राज्याची प्रगती कशी झाली, असा सवाल यावेळी त्यांनी विचारला. गांधींच्या पुतळ्याची पूजा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. अिहसेची शिकवण देणा-या गांधीजींच्या विचाराबाबत काही लोक फार बोलतात मात्र त्यांची शिकवण अनुसरत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेची तोफ डागली.

कर्करोग, मधुमेह या गंभीर आजारांवरील औषधांचा समावेश असलेल्या १०८ औषधांच्या किमती वाढवण्यावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. भारतात चिनी सैन्याची घुसखोरी सुरू असताना चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान झोपाळ्यावर झोके घेत बसले होते, अशी टीका गांधी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत १०० दिवसांत परदेशातील काळा पैसा भारतात परत आणू, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र ते पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.

कॅन्सर सारख्या आजारांवरील औषधांचा समावेश असलेल्या १०८ औषधांच्या किंमती वाढवण्यावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ज्यावेळी चीन भारतात घुसखोरी करत होते. त्यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर पंतप्रधान झोके घेत बसले होते. १०० दिवसांत मोदी सरकारने परदेशातील काळा पैसा भारतात परत आणू असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन भाजपने पाळले नाही असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version