Home महामुंबई महापालिका अभियंत्यांचे आंदोलन स्थगित

महापालिका अभियंत्यांचे आंदोलन स्थगित

0

डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी आणि अभियंत्यांना नाहक गोवले आहे. 

मुंबई – डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी आणि अभियंत्यांना नाहक गोवले आहे. या प्रकरणात ते दोषी नसून, त्यांची कारागृहातून सुटका करावी, या मागणीसाठी ३,५०० अभियंत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र उच्च न्यायालयाने आंदोलनास बंदी घातल्याने हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आठ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीने तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत महापालिका प्रशासनाला नोटिसही दिली होती. मात्र प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. कानडे आणि न्या. सोनप यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. खंडपीठाने समितीला आंदोलन करण्यास मनाई केली. दरम्यान, मंगळवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. त्या वेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. न्यायालयाने समितीला आंदोलन करण्यास मनाई केल्याने समितीने आंदोलन स्थगित केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version