Home महाराष्ट्र महाकवी कालिदासाला चित्रांतून अभिवादन!

महाकवी कालिदासाला चित्रांतून अभिवादन!

0

अजरामर काव्य, नाटय़, नृत्यकला, साहित्यकृती साकारणा-या महाकवी कालिदासाच्या साहित्यावर प्रख्यात शिल्पकार व चित्रकार दिनकर थोपटे यांनी चित्रे रेखाटून कवी कालिदासाला अभिवादन केले आहे.

पुणे- अजरामर काव्य, नाटय़, नृत्यकला, साहित्यकृती साकारणा-या महाकवी कालिदासाच्या साहित्यावर प्रख्यात शिल्पकार व चित्रकार दिनकर थोपटे यांनी चित्रे रेखाटून कवी कालिदासाला अभिवादन केले आहे. कालिदास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता.

मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् ऋतुसंहार आदी संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याच्या कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम् आणि अभिज्ञानशाकुंतलम् ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत.

‘आषाढस्य प्रथम दिवसे!’ कालिदासाच्या अभिजात कलाकृतीतून साकारलेल्या ‘मेघदूत’ या सर्वागसुंदर प्रेमकाव्यातील ही पहिली ओळ आहे. मेघदूतचे केलेले वर्णन जसेच्या तसे चित्रकथेत साकारता यावे म्हणून कित्येक वर्षे अफाट परिश्रम घेऊन ज्येष्ठ चित्रकार थोपटे यांनी निसर्गरम्य अशा जयाद्री खो-यातील साकुर्डेसारख्या खेडेगावची निवड केली.

दिवसरात्र कालिदासाच्या साहित्य ग्रंथातील केवळ काव्याचे वर्णन वाचून चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. यात प्रदेश वर्णन, सौंदर्य वर्णन व त्यांचे अजरामर काव्य नाटय़ साहित्य या घटनेतील पात्रे निसर्गस्थळ महात्म्य कॅन्व्हासवर रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न दिनकर थोपेटे यांनी केल्याचे त्यांच्या चित्रकलेतून सिद्ध होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version