Home महामुंबई मतदान यंत्रावर आता उमेदवाराचेही छायाचित्र

मतदान यंत्रावर आता उमेदवाराचेही छायाचित्र

0

एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने मतदारांचा गोंधळ उडतो.

नवी दिल्ली- एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने मतदारांचा गोंधळ उडतो.

तो टाळण्यासाठी आता मतदान यंत्रावर पक्ष चिन्हाबरोबरच उमेदवाराचे नाव व त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना १ मे २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

याअंतर्गत मतदान यंत्रावर, पोस्टातून दिल्या जाणा-या मतपत्रिकांवर उमेदवाराचे छायाचित्र असेल.

निवडणुकीच्या काळात एकाच मतदारसंघात अनेक उमेदवारांचे नाव एकसारखेच असल्याने मतदारांचा गोंधळ उडतो. मतदान करताना मतदारांच्या मनात संशय उत्पन्न होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

उमेदवाराचे नाव आणि त्याच्या पक्षचिन्हाच्या मध्ये उमेदवाराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी लागणारे रंगीत किंवा कृष्णधवल छायाचित्रही उमेदवाराने आयोगाला द्यायचे आहे, अशी माहिती आयोगाने दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version