Home देश मतदानोत्तर जनमत चाचण्यांवर बंदी

मतदानोत्तर जनमत चाचण्यांवर बंदी

0

पाचराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानोत्तर जनमत चाचण्यांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली- देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका ११ नोव्हेंबर ते चार डिसेंबपर्यंत होणार आहेत. या कालावधीत मतदानोत्तर जनमत चाचण्यांना बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिले.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली व मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने हे आदेश दिले. तसेच मतदानानंतर मतदारांच्या मुलाखती प्रसारित करण्यास वृत्त वाहिन्यांना बंदी घातली आहे.

११ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते चार डिसेंबर साडेपाचपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version