Home देश मतदानाच्या दिवशी मद्यविक्री बंद

मतदानाच्या दिवशी मद्यविक्री बंद

0

मद्याच्या आमिषाने मतदार प्रभावित होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून ४८ तासांसाठी ड्राय ड्रे घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली – मद्याच्या आमिषाने मतदार प्रभावित होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून ४८ तासांसाठी ड्राय ड्रे घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे ज्या राज्यात मतदान असेल त्या राज्यात मद्यविक्री बंद रहाणार आहे. सात एप्रिलपासून नऊ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभेप्रमाणे ज्या राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहे त्या राज्यांनाही हा नियम लागू राहील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मद्याच्या दुकानांबरोबर, रेस्टॉरंट बारमध्येही मद्य मिळणार नाही. निकालाच्या दिवशी १६ मे रोजी संपूर्ण देशात मद्य विक्री बंद रहील. निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना हे निर्देश पाठवले आहेत. ड्राय डे च्या दिवशी एखाद्या व्यक्तीकड़े मद्याचा साठा सापडल्यास त्याच्यावर कारवाई होईल. मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी सर्व आवश्यक पावले उचलावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version