Home महामुंबई मतदानयंत्रांच्या वापराबाबत सावधानता बाळगा

मतदानयंत्रांच्या वापराबाबत सावधानता बाळगा

0

निवडणुकीत मतदानासाठी जुन्या मतपेटयांऐवजी वापरल्या जाणा-या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) मतदानाच्या दिवशी संकलित झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाला याबाबत खबरदारी घेण्याचे उच्च न्यायालयाने सुचवले आहे.

मुंबई – निवडणुकीत मतदानासाठी जुन्या मतपेटयांऐवजी वापरल्या जाणा-याइलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) मतदानाच्या दिवशी संकलित झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाला याबाबत खबरदारी घेण्याचे उच्च न्यायालयानेसुचवले आहे.

उमेदवारांना वॉर्ड, गाव, बुथनुसार पडलेल्या मतांची तपशीलवार माहिती ‘ईव्हीएम’मध्ये असल्याने ही माहिती देण्यास मनाई करण्यासाठी जनहित याचिका न्यायाधीश अभय ओक आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आहे. ईव्हीएममधील माहिती मतमोजणीच्या वेळी आणि नंतर उमेवारांचे प्रतिनिधी व इतरांना पुरवली जाते. या माहितीमुळे संबंधित उमेदवाराला आणि पक्षाला कोणत्या बुथमध्ये, वॉर्डात आणि गावात किती मतदान झाले याचा तपशील मिळतो. अशी माहिती उपलब्ध करून देण्यास निवडणूक आयोगाला मनाई करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात निवडणूक घोषित झाली असून निवडणुकीच्या तोंडावर उपाययोजना करण्यास आयोगाच्या वकिलांनी असमर्थता व्यक्त केली.

याचिकेवर कोणताच हंगामी आदेश देण्यास न्यायालयाने नकार देत मतदानयंत्रांबाबत मात्र सावधानता बाळगण्यास निवडणूक आयोगाला सूचना केली आहे. निवडणुकीनंतर मतदानाचा तपशील उपलब्ध झाल्यास ज्या भागात मतदान झाले नाही त्या ठिकाणी त्या उमेदवाराकडून कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version