Home महामुंबई ठाणे भिवपुरी स्थानकातील धोक्याचे विघ्न दूर

भिवपुरी स्थानकातील धोक्याचे विघ्न दूर

0

मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावरील अनेक विकासकामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहेत.

नेरळ- मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावरील अनेक विकासकामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहेत. पादचारी पुलापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका आता प्रवाशांना पत्करावा लागणार नाही.

तर तेथील अनेक कामे सुरू करून ऐन गणेश उत्सव काळात प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघ गेली अनेक वष्रे प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे. मुंबई विभागीय महाव्यवस्थापक यांनी प्रवासी संघाच्या शिष्टमंडळास भेट देऊन कामांना सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यात डिकसळ भागाकडे पादचारी पुलास रस्ता नसल्याने ती बाब अत्यंत महत्त्वाची होती. त्याचवेळी स्वच्छतागृह तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचवेळी स्थानिक प्रवाशांनी या सुविधांच्या मागण्यांसाठी सह्यांची मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ३ हजार ७०० प्रवाशांनी केवळ एक दिवसात सह्या केल्या होत्या.

या सह्यांचे निवेदन रेल्वेमंत्री तसेच खासदार यांना देऊन पादचारी पूल नव्याने उभारण्याची मागणी केली. ही मागणी असताना मुंबई रेल्वे विभागाने ऐन गणेश उत्सवात सर्व प्रवाशांना सुखद धक्का दिला. डिकसळच्या दिशेने रस्ता तयार केला. तर  स्थानकात मध्यवर्ती ठिकाणी असलेला पादचारी पुलाला हा रस्ता जोडल्याने रस्त्याअभावी रूळ ओलांडण्याची गरज राहिली नाही.

या रेल्वेमार्गावर कायम मालगाडी थांबलेली होती. या मालगाडीखालून प्रवासी धोका पत्करून ये-जा करत होते. अनेकांना यात जीव गमवावा लागला. मात्र, हा रस्ता झाल्यावर रूळ ओलांडण्याचा धोका पत्करण्याची गरज उरली नाही. या रस्त्यावर आता सिमेंट काँक्रिटचेही काम केले जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version