Home महामुंबई ठाणे भिवंडीसह सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी

भिवंडीसह सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी

0

भिवंडी – मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र अशा रमजान ईद नंतरचा ईदूल अजहा (बकरी ईद) हा सण भिवंडी शहरासह पनवेल, उरण, पालघर येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. यानिमित्त भिवंडी शहरातील १३० मस्जिदींमधून विशेष प्रार्थना नमाज अदा करण्यात आली. भिवंडीत ४४०४ जनावरांची,तर १८५८ बोकडांची कुर्बानी देण्यात आली. यातून महानगरपालिकेला ८,८०,८०० रुपये उत्पन्न मिळाले. शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता.

पालघरसह, बोईसरमध्येही मुस्लीम बांधवांबरोबर हिंदू बांधवांनीही शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, मनोरच्या पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये, उपनिरीक्षक पंकज पाटील उपस्थित होते.

उरण येथे शुभेच्छा
उरण येथील जामा मस्जिद, गरीब नवाज सुन्नी अरबी मदरसा व मदरसा ए मेह्मुदिया या तीन मस्जिद येथे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अहेर, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आदींनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली भवरा मस्जिद येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

पनवेलमध्ये रक्तदान शिबीर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल, राष्ट्र सेवा दल, इनरव्हील क्लब ऑफ नवीन पनवेल व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुणे रुग्णालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे हे शिबीर पार पडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रात बकरी ईदच्या दिवसांपासून २८ ऑगस्टपर्यंत ‘रक्तदान अभियान’ राबवत आहे.

या शिबिरात संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच अनेक तरुणांनी रक्तदान केले. या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, अंनिसच्या राज्य पदाधिकारी आरती नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, प्रधान सचिव महेंद्र, इनरव्हील क्लबच्या डॉ. सीमा पवार तसेच अंनिस कार्यकर्ते वैदेही, मनोहर, पद्मा पाटोले, करुणा तांडेल, वैभव, हर्षल, रोनिश, सिद्धेश हे उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version