Home ताज्या घडामोडी भाजप आमदार राम कदम म्हणजे पप्पू!

भाजप आमदार राम कदम म्हणजे पप्पू!

0

बॅनर लावत मनसेने उडवली खिल्ली

मुंबई – भाजप आमदार राम कदम यांना पप्पू म्हणत आणि त्यांच्या विरोधात बॅनर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. प्रजा फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भाजपचे आमदार राम कदम यांचे स्थान ३२ वे म्हणजेच शेवटचे आहे.

राम कदम जेव्हा मनसेत होते, तेव्हा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या कामगिरीत त्यांना शेवटचे ठरवले गेल्याने मनसेने त्यांची खिल्ली उडवली.

या बॅनरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही संदर्भ देण्यात आला आहे. पप्पू कान्ट डान्स साला, गोविंदा आला रे आला, पप्पू कान्ट डान्स साला, तुमचे अभिनंदन, असे खिल्ली उडवणारे बॅनर आणि फ्लेक्स घाटकोपरमध्ये लावण्यात आले आहेत. राम कदम यांच्या घरासमोरही हे बॅनर लावण्यात आले आहेत.

काय आहे प्रजा फाऊंडेशनचा अहवाल?
प्रजा फाऊंडेशनने दोन दिवसांपूर्वीच एक अहवाल सादर केला. २०१६ ते २०१७ दरम्यान चार अधिवेशनात आमदारांनी काय कामगिरी केली? याची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे. या अहवालानुसार काँग्रेसचे मुंबईतील आमदार अमिन पटेल यांना पहिला क्रमांक देण्यात आला आहे. तर भाजपच्या राम कदम यांना शेवटचा म्हणजेच ३२ वा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावरूनच राम कदम यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवली आहे. घाटकोपरमधले हे बॅनर सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version