Home महामुंबई ठाणे बॉम्बच्या अफवेने माथेरान हादरले!

बॉम्बच्या अफवेने माथेरान हादरले!

0

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सोमवारी बॉम्बच्या अफवेने चांगलीच घबराट पसरली.

माथेरान- थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सोमवारी बॉम्बच्या अफवेने चांगलीच घबराट पसरली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासणीत तो बॉम्ब नसून नसून व्हिडीओ डिव्हाइस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माथेरानकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

सोमवारी रामबाग पॉइंट येथे राहणारे विजय पार्टे हे जवळच असलेल्या जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे एक यंत्र दिसले. जवळून पाहिले असता त्यांना ते यंत्र झाडाला बांधलेले असून त्यातून लाल लाईट लागत असल्याचे दिसले.

यावेळी त्यांनी तातडीने माथेरान पालिसांना याची माहिती दिली. सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र असे यंत्र पूर्वी पाहिले नसल्याने ते नेमके काय आहे? याबाबत तेही गोंधळात पडले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी याबाबत थेट रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांना फोन करुन हा प्रकार सांगितला. त्यानुसार हक यांनी श्वानपथक पाठवले.

रात्री ११ वाजता ‘लिलो’ या श्वानाने यंत्र न्याहाळले, मात्र त्याने काहीही संकेत दिला नाही. त्यामुळे सर्वानीच नि:श्वास सोडला. यानंतर हे यंत्र झाडावरून काढून उघडले असता त्यात पेन्सिल सेल, मेमरी कार्ड, माईक व कॅमेरा आढळला. हे यंत्र वनविभागाने प्राण्यांच्या माहितीसाठी लावले असल्याचे समजते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version