Home महाराष्ट्र बॉम्बच्या अफवेने फर्ग्युसन रस्ता बंद

बॉम्बच्या अफवेने फर्ग्युसन रस्ता बंद

0

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिटय़ूटसमोरील बसस्टॉपसमोर निदर्शनास आलेल्या बेवारस बॅगमुळे एकच गोंधळ उडाला.

पुणे – पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिटय़ूटसमोरील बसस्टॉपसमोर निदर्शनास आलेल्या बेवारस बॅगमुळे एकच गोंधळ उडाला. बॉम्बशोधक पथकाने या बॅगेची तपासणी केली असता ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.  दुपारी पावणेबाराच्या सुमारास रानडे इन्स्टिटय़ूटसमोरील बसस्टॉपसमोर एक बॅग बेवारस अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.

पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बच्या भीतीने ही माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच तात्काळ बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगची तपासणी केली असता ही बॅग कोणीतरी प्रवासी विसरला असल्याचे स्पष्ट झाले.

फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकाकडून होणारी वाहतूक थांबवण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. बघ्यांचीही प्रचंड गर्दी होती. सुमारे दीड तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version