Home टॉप स्टोरी बेस्ट कर्मचा-यांचे १ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण

बेस्ट कर्मचा-यांचे १ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण

0

प्रलंबित मागण्यासाठी बेस्टचे कर्मचारी १ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. नियमित वेतन आणि निवृत्त कामगारांची थकबाकी बेस्टने त्वरित द्यावी, या मागणाीसाठी वडाळा आगारात हे उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कामगार संघटनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

मुंबई– प्रलंबित मागण्यासाठी बेस्टचे कर्मचारी १ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. नियमित वेतन आणि निवृत्त कामगारांची थकबाकी बेस्टने त्वरित द्यावी, या मागणाीसाठी वडाळा आगारात हे उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कामगार संघटनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

कामगार संघटनेच्या वतीने बेस्ट संपाबाबत मतदान करून कर्मचा-यांचा कौल घेण्यात आला होता. यात सर्वाधिक कामगारांनी संप करावा या निर्णयावर मतदान केले होते. मात्र संपाचे हत्यार उपसण्यापूर्वी आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी पहिल्यांदा उपोषण करणार असल्याचे स्पष्टीकरण राव यांनी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version