Home देश बेदींविरोधात ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

बेदींविरोधात ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली – आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

किरण बेदी यांनी कृष्णनगर मतदारसंघातून शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह पदयात्रा आणि बाईक रॅली काढली. यावेळी अनेक मतदारांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने बेदींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ‘आप’ने केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी दिल्लीकरांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version