Home टॉप स्टोरी बेदींच्या कारभाराला कंटाळून प्रचारप्रमुखाचा राजीनामा

बेदींच्या कारभाराला कंटाळून प्रचारप्रमुखाचा राजीनामा

0

दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, दिल्ली भाजपामधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, दिल्ली भाजपामधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. दिल्लीच्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कारभाराला कंटाळून त्यांचे प्रचार प्रमुख नरेंद्र टंडन यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.

किरण बेदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीशी आपण जुळवून घेऊ शकत नाही. बेदी आणि त्यांचे सहकारी आपला अपमान करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे कठिण आहे असे नरेंद्र टंडन यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

नरेंद्र टंडन हे अनिल जैन यांच्या अध्यक्षतेखालील प्रचारसमितीमध्ये होते. बेदी यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या प्रचाराच्या व्यवस्थापनाची अतिरिक्त जबाबदारी टंडन यांच्याकडे सोपवण्यात आली होती असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.

टंडन यांच्या राजीनाम्याचा पक्षाच्या निवडणूक तयारीवर कुठलाही परिणाम होणार नाही तसेच त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती अशी सारवासारव भाजपाने केली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा भाजपामधील अंतर्गत अस्वस्थता समोर आली आहे. किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशानंतर चार दिवसातच त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवल्याने भाजपामध्ये आधीपासूनच नाराजी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version