Home टॉप स्टोरी बिहार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बिहार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

0

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

नवी दिल्ली- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण  पाच टप्प्यात मतदान  होणार असून, आठ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

पहिल्या टप्प्यातील मतदान १२ ऑक्टोबरला, १६ ऑक्टोबरला दुस-या टप्प्यातले, २० ऑक्टोबर तिस-या टप्प्यातले, एक नोव्हेंबरला चौथ्या टप्प्यातले तर पाच नोव्हेंबरला पाचव्या टप्प्यातले मतदान होणार आहे तर मतमोजणी आठ नोव्हेंबरला होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

बिहार विधानभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. बिहारमध्ये ६ कोटी ६८ लाख मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी ४३ मतदारसंघ राखीव असणार आहेत.

३८ जिल्ह्यांपैकी २९ जिल्हे नक्षल प्रभावित आहेत तेथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, विशेष कमांडो व पोलिस असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान यंत्रावर सर्व उमेदवाराचे छायाचित्र असणार आहे.  पहिल्यादांच अशी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version