Home टॉप स्टोरी बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता

बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता

0

जनता परिवार विरुद्ध भाजपा असे राजकीय युद्ध रंगणा-या बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – जनता परिवार विरुद्ध भाजपा असे राजकीय युद्ध रंगणा-या बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मु्ख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयला ही माहिती दिली.

या वर्षात सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. मात्र याबाबतचे अंतिम वेळापत्रक बनवण्याचे काम सुरु असल्याचे झैदी यांनी सांगितले.

बिहारमधील हवामान, सण, परीक्षा, सुट्ट्या, मान्सूनचे प्रमाण या सर्व बाबींचा विचार करुनच निवडणुकीचे वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. बिहारमध्ये किती टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार याबाबतची माहिती देणे मात्र त्यांनी टाळले.

निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरव्यवहार ही बिहारमधील मोठी समस्या आहे. त्यामुळे या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही पद्धतशीरपणे नियोजन करत आहोत. कायदे मंत्रालयाकडून निवडणुकीबाबत अद्याप काही अधिकृत सुधारणा येणे बाकी आहे, असे झैदी म्हणाले.

बिहारमधील मतदारसंघाचे तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. जे मतदारसंघ अधित प्रभावित आहेत तेथे मोठया प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात येणार असल्याचे झैदी यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version