Home Uncategorized बाजार सावरला

बाजार सावरला

0

सलग तीन दिवसांच्या विक्रीनंतर गुंतवणूकदार पुन्हा बाजाराकडे वळल्याने शुक्रवारी बाजाराला दिलासा मिळाला.

मुंबई – सलग तीन दिवसांच्या विक्रीनंतर गुंतवणूकदार पुन्हा बाजाराकडे वळल्याने शुक्रवारी बाजाराला दिलासा मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६५ अंकांनी वाढून पुन्हा २७,०००वर झेपावला. तर राष्ट्रीय शेबर बाजाराच्या निफ्टीनेही २० अंकांच्या वाढीसह ८,१००ची पातळी पुन्हा मिळवली.

औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ महागाईकडून दिलासा मिळण्याच्या अपेक्षेने बाजारात खरेदी झाली. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २७,०६१.०४ आणि ८,१०५.५०वर बंद झाला. रुपयाही २८ पैशांनी वाढून ६०.६५वर बंद झाला.

दोन्ही निर्देशांकांनी सलग पाच साप्ताहिक वाढीची नोंद केली. औषध निर्माण, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, वाहन आणि एफमएमसीजी क्षेत्रातील शेअरना मागणी राहिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version