Home महाराष्ट्र कोकण बांद्यात १०८ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बांद्यात १०८ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या १०८ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला आहे.

बांदा- बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या १०८ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच विद्यमान आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी बांदा सरपंच मंदार कल्याणकर, पं. स. सदस्य बबन राणे, स्वप्नील नाईक, सौ. श्वेता कोरगावकर, विनायक दळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा संघटक अन्वर खान, बांदा शहर काँग्रेस अध्यक्ष जावेद खतिब, माजी पं. स. सदस्या सौ. राखी कळंगुटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, डिंगणे सरपंच सौ. स्मिता नाईक, उपसरपंच रोहित नाडकर्णी, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, विनेश गवस, गजानन गायतोंडे, दशरथ घाडी, राजेश गोवेकर, प्रवीण कळंगुटकर, रवी आमडोसकर, श्यामराव सावंत, विद्याधर नाईक, राजू सावंत, मिलिंद सावंत, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. श्रद्धा कासार, डॉ. दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. साळे म्हणाले, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे महामार्गावरील आरोग्य केंद्र असल्याने याठिकाणी सातत्याने रुग्णांची गर्दी असते. अपघातग्रस्तांनाही तातडीची सेवा द्यावी लागते. प्राथमिक उपचाराअंती बहुतांशी रूग्णांना अधिक उापचारासाठी अन्यत्र हलवावे लागते.

अशावेळी आरोग्य केंद्राची स्वतंत्र रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्थानिक जि. प. सदस्य प्रमोद कामत व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत ही मागणी लावून धरली होती. त्यांनीच केलेल्या पाठपुराव्यानुसार बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ही सुसज्ज रुग्णवाहिका मिळाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version