Home महामुंबई बलात्कार पिडीतांचा वैद्यकीय खर्च सरकारकडून अदा

बलात्कार पिडीतांचा वैद्यकीय खर्च सरकारकडून अदा

0

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिला छायाचित्रकार आणि पिझ्झा हट बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आला.

मुंबई- शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिला छायाचित्रकार आणि पिझ्झा हट बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आला.

शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्टला पाच नराधमांनी पीडित महिला छायाचित्रकार हिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आठवडाभर उपचार केल्यानंतर पिडीत तरुणीला रुग्णालयातून घरी सोडले होते. या तरुणीच्या उपचारासाठी आलेला खर्च जसलोक रुग्णालयाला  देण्यात आला. या खर्चाची रक्कम एक लाख ८५ हजार ८५९ रुपये देण्यात आले आहेत.

दुस-या एका प्रकरणात २५ जून रोजी पिझ्झा डिलिव्हरी तरुणाने वरळी येथे एका महिलेवर बलात्कार केला होता. तिला एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. त्या पिडीत महिलेसाठी झालेला वैद्यकीय खर्च ९३ हजार ५०९ रुपये रहेजा रुग्णालयास देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version