Home देश बलात्कारास विरोध केल्याने महिलेची हत्या

बलात्कारास विरोध केल्याने महिलेची हत्या

0

मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील राजा रोंगत येथे बलात्कार करण्यास विरोध केल्याने महिलेच्या डोक्‍यात गोळी घालून हत्या करण्यात आली.

शिलाँग- मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील राजा रोंगत येथे बलात्कार करण्यास विरोध केल्याने महिलेच्या डोक्‍यात गोळी घालून हत्या करण्यात आली. गारो नॅशनल लिबरेशन आर्मी (जीएनएलए) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी हे निघृण कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

ही महिला आपल्या पती आणि पाच मुलांसह घरात असताना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चार-पाच दहशतवादी घरात घुसले. त्यांनी तिचा पती आणि मुलांना घरात कोंबून ठेवले आणि या महिलेस घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता तिने कडाडून विरोध केला. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने स्वयंचलित रायफलने तिच्या डोक्यात गोळी घातली. यात तिच्या डोक्याचे चिंधड्या झाल्याचे पोलिस महासंचालक जीएचपी राजू यांनी सांगितले.

येथील खासदार पी. ए. संगमा यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. गारो हिल्स भागामधील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. राज्य सरकार या समस्येवर मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे संगमा यांनी सांगितले. यासंदर्भात नॅशनल पिपल्स पार्टीतर्फे एक शिष्टमंडळ गृहराज्यमंत्री खिरेन रिजिजू यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

[EPSB]

भारतात महिलांवर अत्याचार- अमेरिका व्यथित »

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेले महिलांवरील बलात्कार, छळ, हत्या आणि अत्याचाराने अमेरिका व्यथित झाली आहे.…

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version