Home क्रीडा बंगळूरुच्या मदतीला लोकेश राहुल

बंगळूरुच्या मदतीला लोकेश राहुल

0

यष्टिरक्षक, फलंदाज लोकेश राहुलच्या (५३ चेंडूंत नाबाद ६८ धावा) फटकेबाजीमुळे आयपीएल-९मध्ये बुधवारी गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध यजमान बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी ४ बाद १५१ धावा केल्या. 

बंगळूरु- यष्टिरक्षक, फलंदाज लोकेश राहुलच्या (५३ चेंडूंत नाबाद ६८ धावा) फटकेबाजीमुळे आयपीएल-९मध्ये बुधवारी गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध यजमान बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी ४ बाद १५१ धावा केल्या. 

फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीसह (७) पुनरागमन केलेला सलामीवीर ख्रिस गेल (५) लवकर बाद झाल्याने यजमानांची अवस्था २ बाद १७ धावा अशी वाईट झाली. मात्र लोकेश राहुलने दमदार नाबाद अर्धशतक ठोकताना बंगळूरुला दीडशेपार नेले. त्याला एबी डेविलियर्स (२४) तसेच सचिन बेबीची (नाबाद २५) चांगली साथ लाभली. शेवटच्या पाच षटकांत षटकामागे दहाच्या सरासरीने धावा फटकावताना लोकेश आणि सचिनने बंगळूरुला सावरले.

लोकेश राहुलच्या ५३ चेंडूंतील नाबाद ६८ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. शेन वॉटसनने (१४ चेंडूंत १५ धावा) त्याच्या छोटेखानी खेळीत १ चौकार आणि १ षटकार लगावला. सचिन बेबीने १३ चेंडूंत २५ धावांची नाबाद खेळी करताना २ चौकार आणि तितकेच षटकार ठोकले.

मुंबईतर्फे वेगवान गोलंदाज टिम साउदीसह मिचेल मॅकक्लेनॅघन तसेच कृणाल पंडय़ाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

बंगळूरुच्या मदतीला लोकेश राहुलबंगळूरु- यष्टिरक्षक, फलंदाज लोकेश राहुलच्या (५३ चेंडूंत नाबाद ६८ धावा) फटकेबाजीमुळे आयपीएल-९मध्ये बुधवारी गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध यजमान बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सनी ४ बाद १५१ धावा केल्या.

फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीसह (७) पुनरागमन केलेला सलामीवीर ख्रिस गेल (५) लवकर बाद झाल्याने यजमानांची अवस्था २ बाद १७ धावा अशी वाईट झाली. मात्र लोकेश राहुलने दमदार नाबाद अर्धशतक ठोकताना बंगळूरुला दीडशेपार नेले. त्याला एबी डेविलियर्स (२४) तसेच सचिन बेबीची (नाबाद २५) चांगली साथ लाभली. शेवटच्या पाच षटकांत षटकामागे दहाच्या सरासरीने धावा फटकावताना लोकेश आणि सचिनने बंगळूरुला सावरले.

लोकेश राहुलच्या ५३ चेंडूंतील नाबाद ६८ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. शेन वॉटसनने (१४ चेंडूंत १५ धावा) त्याच्या छोटेखानी खेळीत १ चौकार आणि १ षटकार लगावला. सचिन बेबीने १३ चेंडूंत २५ धावांची नाबाद खेळी करताना २ चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. मुंबईतर्फे वेगवान गोलंदाज टिम साउदीसह मिचेल मॅकक्लेनॅघन तसेच कृणाल पंडय़ाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version