Home क्रीडा फ्रेंच ओपन – सायनाचे आव्हान संपुष्टात

फ्रेंच ओपन – सायनाचे आव्हान संपुष्टात

0

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला फ्रेंच ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

पॅरिस – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला फ्रेंच ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

अटीतटीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या चीनच्या शिजियन वँगने सायनाचा १९-२१, २१-१९ आणि १५-२१ असा पराभव केला. एक तास १० मिनिटे ही लढत सुरु होती. यात चीनच्या वँगने बाजी मारली.

लढतीतील पहिला गेम सायनाने १९-२१ ने गमावल्यानंतर दुस-या गेममध्ये तिने पुनरागमन केले आणि दुसरा गेम २१-१९ने जिंकला. मात्र हाच फॉर्म कायम ठेवण्यात सायनाला अपयश आले आणि तिस-या आणि निर्णयाक गेममध्ये चीनच्या वँगने आघाडी मिळवत सायनाला पराभूत केले. यासोबतच सायनाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version