Home क्रीडा ‘फ्रीडम कप’ फिडे बुद्धिबळ स्पर्धा

‘फ्रीडम कप’ फिडे बुद्धिबळ स्पर्धा

0

अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आणि किंग चेस अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने १५ आणि १६ ऑगस्ट २०१५ दरम्यान ‘फ्रीडम कप’ या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई- अस्तित्व संस्कार प्रबोधिनी आणि किंग चेस अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने १५ आणि १६ ऑगस्ट २०१५ दरम्यान ‘फ्रीडम कप’ या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय तसेच मानांकित बुद्धिबळपटूंसाठीच्या या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.

करी रोड स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्ग शाळेत होणा-या दोनदिवसीय बुद्धिबळ महोत्सवात खुली फिडे मानांकन तसेच फिडे ब्लिट्झ मानांकन बुद्धिबळ स्पर्धा खेळविली जाईल. सर्व गटातील बुद्धिबळपटूंना समोर ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत फिडे मानांकन स्पर्धेत ७० हजारांची तर फिडे ब्लिट्झ प्रकारात ५० हजारांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

अव्वल तीन विजेत्यांसह दोन्ही गटात ८ ते  १६ वयोगटांतील बुद्धिबळपटूंनाही प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजक पुरुषोत्तम भिलारे यांनी दिली. स्पर्धेतील सहभागासाठी पुरुषोत्तम भिलारे (९८६९०१७२२१), विश्वनाथ माधव (९८२०१२१२४१), अभिषेक चव्हाण (९३२४४९३२२२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अस्तित्व संस्कार प्रबोधिनीचे अध्यक्ष तानाजी साळेकर यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version